जगभरात दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- पर्यटनाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक महत्त्व यांबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- २०२६ ची संकल्पना/थीम (Theme): 'पर्यटनाची पुनर्रचना करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism)' ही यंदाच्या या दिवसाची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेमार्फत (United Nations World Tourism Organization - UNWTO)' जिचे मुख्यालय स्पेनमधील माद्रिद येथे आहे - १९८० मध्ये जागतिक पर्यटन दिनाची सुरुवात करण्यात आली होती.
- पहिल्यांदा अधिकृतपणे २७ सप्टेंबर १९८० रोजी हा दिवस साजरा करण्यात आला होता.
- २०२६ चा जागतिक पर्यटन दिन पहिल्यांदाच 'एल साल्वाडोरद्वारे (El Salvador)' अधिकृतपणे आयोजित करण्यात आला होता.
- पर्यटन मंत्रालयामार्फत नवी दिल्लीतील 'भारत मंडपम' येथे आयोजित जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शविली.